मराठीत फलक दिसला पाहिजे….; राज ठाकरे यांची ईडीला नोटीस

मुंबई |  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूरप्रकरणी चौकशी सुरु आहे. ईडीने नोटीस पाठवून राज ठाकरे यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांची काल जवळपास 9 तास चौकशी झाली. त्यानंतर आता मनसेनेसुद्धा ईडीला नोटीस पाठवली आहे. 

महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत. त्यामुळे त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्या नोटीशीची प्रत ईडीला पाठवली असल्याचं मनसेच्या वतीने सांगण्यात आलंय. शिवाय मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार का?  असा सवालही मनसेने विचारला.

यापूर्वी मनसेने दुकानांवरील पाट्यांसाठी आंदोलन केलं होतं. दुकानावरील पाट्या मराठीत हव्या यासाठी मनसेने आंदोलन केलं होतं. त्यामुळे आता नोटीस पाठवणाऱ्या ईडीला मनसेने नोटीस पाठवून, मराठीत फलक लावण्याची मागणी केली आहे.

मनसेच्या या नोटीसनंतर ईडी कार्यालयावर मराठीत अंमलबजावणी संचालनालय ही अक्षरे झळकणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या ईडी कार्यालयाबाहेर जो फलक आहे, त्यावर हिंदीमध्ये प्रवर्तन निदेशालय असं लिहलं आहे. त्याखाली Enforcement Directorate असं इंग्रजीत लिहिलं आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल  सकाळी 11.30 वाजता सुरु झालेली चौकशी रात्री 8 वाजेपर्यंत चालली. कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी चौकशी संपल्यानंतर दिली.

महत्वाच्या बातम्या-

-सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे- उद्धव ठाकरे

-मुख्यमंत्री एमबीए आहेत, याचा अर्थ असा की…; अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

-संंजय बांगर यांना हटवून भारतीय फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी ‘यांची’ निवड

-समाजकंटकांना पोलीस ठोकणार की मी ठोकू???- नितीन नांदगावकर

-…यापुढे राष्ट्रवादीच्या सभेत ‘हे’ दोन झेंडे राहतील- अजित पवार