मुंबई | काल बुधवारी (दि. 21) रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला होता. यावेळी शिवसेनेचे राज्यभरातील गटप्रमुख उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली. त्यांनी यावेळी दसरा मेळावा घेण्याबाबत देखील आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ही उद्धव ठाकरेंची निराशा बोलत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2019 साली विधानसभेच्या निवडणुकीत हे (शिवसेना) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) फोटो वापरुन निवडून आले. मात्र निवडून आल्यावर त्यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षासोबत आघाडी केली.
शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी त्यावेळी राजीनामे देऊन परत निवडणुका का नाही घेतल्या? असा प्रश्न देवेद्र फडणवीस यांनी केला आहे.
यावेळी देवेद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर मोठे आरोप केले. महाविकास आघाडीने मला गेली अडीच वर्षे संपविण्याचा प्रयत्न केला होता, असे फडणवीस म्हणाले.
मात्र महाविकास आघाडी त्यावेळी देखील मला संपवू शकली नाही, आणि याच्यापुढेही संपवू शकणार नाहीत, असे प्रत्युत्तर देवेद्र फडणवीस यांनी केेले.
महत्वाच्या बातम्या –
भाजपच्या मिशन ‘मुंबई’मध्ये आता पंतप्राधान मोदी उतरले
दसरा मेळाव्याबाबत मोठी बातमी; शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याला..
“हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देखील आमदार नाही” वक्तव्यावर मनसेचे शरद पवारांना सडेतोड उत्तर
‘भाजपचा एकनाथ शिंदे गटाला दणका’
‘मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेची नवी खेळी’