मै समुंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा….-देवेंद्र फडणवीस

मुंबई : मी म्हटलं होतं, मी पुन्हा येईन पण मी त्यावेळी टाईमटेबल सांगितलं नव्हतं…. पण काळजी करू नका… ‘मेरा पाणी उतरता देख… मेरे किनारें पें घर मत बसा देना… मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा’ अशा शायरीतून सत्ताधाऱ्यांच्या आज सकाळपासूनच्या कोपरखळ्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

‘मी पुन्हा येईन’…. या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याचा संदर्भ देत आज विधानसभेत बऱ्याच सदस्यांनी हास्याचे फवारे उडवले. तत्पूर्वी भाजपने आज विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांनी निवड केली. त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज विधीमंडळात मांडण्यात आला होता. त्याच अभिनंदन प्रस्तावावर फडणवीस आभार मानत होते.

विरोधी पक्षनेतेपदाची या सभागृहाला उत्तम परंपरा आहे. आज माझी निवड झालीये. मी उत्तररित्या या पदावर काम करेल. दुसरीकडे या पदावर जास्त दिवस तुम्ही काम करू नये. मुख्यमंत्रिपदावर तुम्ही लवकरच विराजमान व्हावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मेरिट नसलेल्यांनी सत्ता मिळवली. परंतू काही हरकत नाही, लोकशाहीमध्ये अश्या गोष्टी होत असतात, असा टोला पडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादीला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-