मुंबई | सोशल मीडियावर रानू मंडल यांचा काही महिन्यांपूर्वी गाणं गातानाचा व्हीडिओ चर्चेत आला होत्या. त्यानंतर प्रसिद्ध गायक हिमेश रेशमीया यानं आपल्या चित्रपटात राणू मंडल यांना गाणं गाण्याची संधी दिली. त्यानंतर रानू मंडल रातोरात स्टार झाल्या. मात्र एका कार्यक्रमात राणू मंडल यांना त्यांच्याच गाण्याच्या ओळींचा विसर पडला आहे.
रानू मंडल यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त करत होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना हिमेश रेशमीया बरोबर गायलेले ‘तेरी मेरी’ या गाण्याच्या दोन ओळी गाण्याची विनंती केली गेली. मात्र हातात माईक घेताच त्यांना त्यांचंच गाणं आठवलं नाही.
आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे रानू मंडल यांना ‘तेरी मेरी’ या गाण्यामुळेच प्रसिद्धी मिळाली होती. याच गाण्याने त्यांना रातोरात सेलिब्रिटी स्टेटस मिळवून दिलं होतं. आणि त्याच गाण्याच्या ओळी त्यांना आठवेनासे झाल्यामुळं त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. परंतु हा प्रसंग कुठल्या कार्यक्रमात घडला याची कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
मै समुंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा….-देवेंद्र फडणवीस – https://t.co/m1QZs8CBr5 @Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“तुम्ही सोबत असता तर मी हे सर्व टीव्हीवर बघितलं असतं” – https://t.co/olXoXFSuGc @OfficeofUT @Dev_Fadnavis @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
सोलापुरात दोन अपक्ष… मामांचा ठाकरेंना पाठिंबा तर भाऊंची निष्ठा भाजपवर!-https://t.co/uJvbGPsmGT @NCPspeaks @ShivSena @INCMumbai @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019