“महाराष्ट्रात 2024 मध्ये ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री व्हावा”

मुंबई | राज्यात सध्या भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार संघर्ष पेटला आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

राज्यात सातत्यानं ब्राम्हण व्यक्तींच्या राजकारणावरून वाद होत आला आहे. काही दिवसांपुर्वीच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी ब्राम्हण समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याबाबत वक्तव्य केलं होतं.

रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता रामदास आठवलेंनी देखील ब्राम्हण व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. परिणामी राज्यात नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

आगामी 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची ईच्छा असून त्यासाठी भाजपला पुर्ण समर्थन देणार असल्याचंही आठवले म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस जरी ब्राम्हण समाजाचे असले तरी ते बहुजन समाजाला न्याय देतात, अशी स्तुतीसुमने आठवलेंनी उधळली आहेत. आठवलेंच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

आम्हाला 2024 मध्ये पुन्हा ब्राम्हण समाजाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, असं वक्तव्य देखील रामदास आठवलेंनी केलं आहे. परिणामी आठवलेंवर आंबेडकरी चळवळीतून टीका होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर देखील आठवलेंनी यावेळी जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंनी अंगावर घेतलेल्या भगव्या रंगाप्रमाणं वागावं, असा टोला आठवलेंनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल

  “मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”

  Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

 “उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण”

“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही”