“पुढील 15 वर्षात…”, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गेल्या काही दिवसांपासून आपलं प्रखर मत मांडताना दिसत आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांनी हिंदूत्वाची प्रखर भूमिका मांडली आहे.

अशातच एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता देशभर चर्चांना उधाण आलंय. मोहन भागवत यांनी पुढील 15 वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल, असं वक्तव्य केलंय.

हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल, असं वक्तव्य देखील मोहन भागवत यांनी केलं आहे.

आमच्या मनात द्वेष नाही. पण जग शक्तीला मानलं मग काय करणार?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सनातन धर्माचा विरोध करणाऱ्यांनी देखील आम्हाला मदत केली. जर त्यांनी विरोध करत आवाज उठवला नसता तर हिंदू जागा झाला नसता, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांवर टीकास्त्र, म्हणाले…

“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”

“स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात”

Jayashree Patil | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार 

अत्यंत धक्कादायक प्रकार समोर; घोरपडीवर सामूहिक बलात्कार