Top news देश

“शिवसेनेचा इतिहास पाहा, नाव महाराजांचं घेतील पण काम मुघलांचं करतील”

सिल्वासा | खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. या प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर ५६ जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? अशी विचारणा करत ते इथे आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आपलं भवितव्य बदलण्यासाठीची ही संधी आहे. देशातील गरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, हे मोदींनी देशात करुन दाखवलं, असंही फडणवीस म्हणालेत.

दरम्यान, दादरा नगर-हवेलीतही प्रत्येकाला पक्की घरे दिली जातील. महाराष्ट्रात 10 लाख घरे दिली आहेत. आदिवासींपर्यंत मोदींचा विकास पोहोचतोय, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

माझा उद्धव ठाकरेंवर पूर्ण विश्वास, ते सत्याचीच बाजू घेतील- क्रांती रेडकर

“संजय राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार”

“आजच्या महिला पुढारलेल्या पण नवाब मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे”

“भाजपचा जन्म पवित्र झग्यातून झाला नाही, तुमच्याच अंगावर तुमचंच प्रकरण उलटलंय”

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर लेटर बॉम्ब; केला मोठा गौप्यस्फोट