“नवाब मलिकांचं दुःख वेगळं आहे, ते स्पष्टपणे समोर येतय”

मुंबई | अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणं हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडे यांच्या पत्नीला खुलासा करावा लागला. वानखेडे यांनीही आपल्या प्रमाणपत्राबाबत खुलासा केलाटय. त्यामुळे विशिष्ट हेतूने आरोप करणं योग्य नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांचे दुःख वेगळे आहे. ते स्पष्टपणे समोर येत आहे आहे. तपास अधिकाऱ्यांना टार्गेट करणे हे योग्य नाही. कारण, ते घटनात्मक पदावर आहेत, असं फडणवीस म्हणालेत.

घटनात्मक पदावरचा माणूस सांगेल की मी याला जेलमध्ये टाकणार, कारवाई करणार, सर्टिफिकेट खोटे आहे. परत आपल्या सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचे. हे जे सुरू आहे ते बरोबर नाही, असं फडणवीस म्हणालेत.

माझं म्हणणं एवढेच आहे की साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायालयाबाहेर समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कुठलीच केस टिकणार नाही. त्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर झाला तर तेही चूक असेल. पण एक गोष्ट निश्चित की या प्रकरणात काही आरोप निश्चित झालेत. एनसीबीतील वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. पण त्याच वेळी तपास अधिकाऱ्यांना धमकावणे हे योग्य नाही, असंही देेवेंद्र फडणवीस म्हणाले.

NCB चा वापर राजकीय दबाब आणण्यासाठी का होईल? NCB कारवाई कोणावर करते? त्यांची सर्व कारवाई ड्रग्सच्या प्रकरणात होते! मग असे म्हणायचे का, सगळ्या ड्रग्जवाल्यांसाठी तुम्ही बॅटिंग करीत आहात ? असे नाही ना म्हणता येत! मुळात त्यांचं दुःख आहे की जे छापे पडत आहेत आणि त्यातून जी माहिती बाहेर येत आहे, यातून हे खरोखर महावसुली सरकार आहे असा एक संदेश लोकांमध्ये जात आहे आणि त्यावर लोकांचा विश्वास बसतोय, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेनेचा इतिहास पाहा, नाव महाराजांचं घेतील पण काम मुघलांचं करतील”

माझा उद्धव ठाकरेंवर पूर्ण विश्वास, ते सत्याचीच बाजू घेतील- क्रांती रेडकर

“संजय राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार”

“आजच्या महिला पुढारलेल्या पण नवाब मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे”

“भाजपचा जन्म पवित्र झग्यातून झाला नाही, तुमच्याच अंगावर तुमचंच प्रकरण उलटलंय”