“आज गौप्यस्फोट करतोय; अजित पवारांआधी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती”

मुंबई | विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नव्हे तर थेट राष्ट्रवादी, त्याबाबत चर्चाही झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘द इनसायडर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर सविस्तर भाष्य केलं.

दोन वर्षापूर्वी एक स्थिती अशी होती की राष्ट्रवादी आणि भाजप सोबत यायचं असा निर्णय झाला होता. राष्ट्रवादी आणि भाजप जर सोबत येणार असेल तर शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं. काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल. शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही, असा निरोप गृहमंत्री अमित शहांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला होता, असं फडणवीस म्हणाले.

निवडणुकीनंतर ज्यावेळी शिवसेना येत नाही असं लक्षात आलं, तेव्हा आमच्याकडे कोणते पर्याय आहे याचा आम्ही विचार केला. त्यातल्या एका पर्यायात आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही. थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो, असं फडणवीस म्हणाले.

एकदम टोकाच्या चर्चा झाल्या होत्या, मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो. आम्ही शांत बसून होतो. दोन ते तीन दिवस असे होते की आम्ही मनातून ठरवलं होतं की आपल्या हातात हे सरकार नाही. हे सरकार आता गेलं, मात्र त्या तीन चार दिवसांनंतर अजित पवारांकडून आम्हाला फिलर आला आणि ते म्हणाले, की हे तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही. यातून राज्याचं नुकसान होईल. म्हणून मी तुमच्यासोबत सरकार बनवायला तयार आहे. त्यांच्याकडे आमदारांची संख्याही होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागला असता तर मी छातीठोकपणे सांगतो की हे सरकार टिकलं असतं, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-नगरमध्ये भाजपचा खासदार असताना सुजय विखेंना तिकीट का दिलं?; फडणवीस म्हणतात…

-…म्हणून चंद्रकांत पाटील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढले- देवेंद्र फडणवीस

-भाजप-राष्ट्रवादीचे सरकार २ वर्षांपूर्वी बनले असते, पण… फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

-गूड न्यूज… पूर्व लडाखमधून चीन सैन्य मागे घेण्यास तयार!

-एवढ्या जागा जिंकूनही मी मुख्यमंत्री झालो नाही याचं वाईट वाटलं- फडणवीस