देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती, म्हणाले…

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचा तिसरा उमेदवारही विजयी झाला. त्यातच भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे.

गुरूवारी 2024च्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती दिली आहे. तर भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदार संघावंर अधिक लक्ष देणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

येत्या 17 ते 18 महिन्यांत लोकसभा निवडणुकांसाठी कसं काम करायचं याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तर फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नसल्याचंही फडणवीस म्हणाले.

आतापासूनच जनतेत राहुन काम करायचं आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली. राज्यात 48 पैकी 48 लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

48 मतदारसंघांमध्ये आम्ही ताकदीने लढू, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या असून आम्ही त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील जागांच्या संदर्भात एक समिती तयार केली असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात मान्सून बरसणार, ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा जारी

सावधान! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही लक्षणीय वाढ, वाचा आकडेवारी

“20 जूनला देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार करणार”

“पंकजा मुंडेंनी स्वत:चा पक्ष स्थापन केला तर राजकीय भूकंप येईल”

मोठी बातमी! केतकी चितळेचा जामीन मंजूर मात्र मुक्काम अद्यापही तुरूंगातच