राज्यात मान्सून बरसणार, ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा जारी

मुंबई | कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर नागरिक आतुरतेने पावसाची वाट बघत होते. अखेर तापलेल्या महाराष्ट्राला आता मान्सूनने व्यापलं आहे.

राज्यात हळूहळू मान्सून पुढे सरकत आहे. त्यात हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा जारी केला आहे.

हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 18 जूननंतर महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार आहे.

राज्यात पुढचे दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊन पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर राज्यातील काही भागांना अतिवृष्टीचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे.

कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेर लावली. तर 18 जूननंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, पावसाने राज्यात दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. तसेच पावसामुळे शेतीच्या कामांनादेखील वेग आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही लक्षणीय वाढ, वाचा आकडेवारी

“20 जूनला देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार करणार”

“पंकजा मुंडेंनी स्वत:चा पक्ष स्थापन केला तर राजकीय भूकंप येईल”

मोठी बातमी! केतकी चितळेचा जामीन मंजूर मात्र मुक्काम अद्यापही तुरूंगातच

“संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणूनच महाविकास आघाडी स्थापन झाली”