“पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत का? गोपीचंद पडळकर यांच्यावर…”

मुंबई | राज्य विधीमंडळ अधिवेशनात राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. पदभरती, आरक्षण, निवडणुका यावरून सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर साताऱ्यात हल्ला झाला होता. यावरून अधिवेशनात मोठा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आपल्या महाराष्ट्रात आता रक्षकच भक्षक झाले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडी पोलीस स्थानकाच्या समोर हल्ला झाला होता.

गोपीचंद पडळकर यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या कट रचण्यात राजकीय नेत्यांनी पोलिसांना सामिल केले का?, पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत का?, असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.

महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका. महाराष्ट्रात राजकीय हत्या होऊ देऊ नका, असं फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ला प्रकरणानं राज्यभर राजकीय तणाव निर्माण  झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे माजी गृहमंत्री म्हणून काम पाहिल्यानं त्यांनी साताऱ्यातील पोलिसांवर नाव घेत टीका केली आहे. परिणामी आता सरकार पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करणार का?, असा सवाल उपस्थित झाला आहे.

पोलीस स्टेशनमधील सर्व पुरावे फडणवीसांनी सभागृहात सादर केले आहेत. पोलीस स्थानकाच्या समोरच हा प्रकार घडल्यानं पोलीस प्रशासनच आता चौकशीच्या घेऱ्यात सापडलं आहे.

गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रावादीमधील वाद हा अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परिणामी फडणवीसांनी राज्य सरकार त्यांच्या हत्येचा कट रचत असल्याची गंभीर टीका केल्यानं राज्यातील वातावरण तापलं आहे.

दरम्यान, फडणवीस यांच्या टीकेनंतर आता राज्याचे गृहमंत्री या प्रकरणात काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. पडळकर प्रकरणानं राज्य सरकारची डोकेदुखी वाढवली आहे हे मात्र नक्की.

महत्वाच्या बातम्या- 

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा 

“अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर” 

‘…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते” 

नितेश राणे अज्ञातवासात?, नारायण राणे म्हणतात… 

“…नाहीतर शशी थरूर यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल”