राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

सातारा |  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासंबंधी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar) यांना विचारले असता चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी  राज्यपालांनी दोन वेळा तारखा देऊनही महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) निवडणूक घेतली नाही. हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे. याच एका मुद्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून शरद पवारांनी खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यातील विधीमंडळामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे जे अस्वस्थ आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

ते लोक अशा प्रकारची विधान करत असतात. त्यांनी यापुर्वीही अशी वक्तव्य केली आहेत. परंतु, राज्यातील सर्वसामान्य जनतेची त्यांनी नोंद घेतली नाही. त्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे मी अधिक भाष्य करणार नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते महाविकास आघाडी सरकारने केलं आहे, असं भाजपच्या लोकांंच म्हणण आहे. त्यावर शरद पवारांना प्रश्न विचारल्यानंतर ते भाजपच्याच लोकांना विचारावं लागेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी निवडणूक कार्यक्रमाला अद्याप मंजूरी दिली नाही.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली असता अभ्यास करून निर्णय घेण्याचं आश्वासन  राज्यपालांनी दिलं आहे.

राज्यपालांच्या सहीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून अभ्यास करून निर्णय घेतो असं म्हटल्याने शिवसेना (ShivSena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोचरी टीका केली आहे.

इतका अभ्यास बरा नाही त्याचं ओझ झेपलं पाहिजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागतात. आपल्या संविधानात काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आता 12 आमदारांच्या शिफारशीला एक वर्ष पुर्ण होत आहे. त्या शिफारशी बंधनकारक आहेत. आपल्या संविधानात लिहील आहे. परंतु राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. राज्यपालचं नाही तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा 

“अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर” 

‘…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते”