विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. उद्या आवाजी मतदानाच्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडणार होती. मात्र आता निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा दिवस आहे. त्यासाठी नियम देखील बदलण्यात आले आहेत. अशातच आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यावर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. नियम बदलाची प्रक्रिया ही घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक ही गुप्त पद्धतीने होत होती. मात्र, त्यात बदल करण्यात आला होता. आता ही निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलला होता.

राज्य सरकारने आवाजी पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांंनी म्हटलं आहे.

काल बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती आणि सरकारकडून बदलण्यात आलेल्या नियमांची परवानगी मागितली होती.

दरम्यान, राज्य सरकारच्या या मागणीवर आता राज्यपालांनी पत्र लिहित उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही, यावर आता सर्वांच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा 

“अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर” 

‘…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते” 

नितेश राणे अज्ञातवासात?, नारायण राणे म्हणतात…