“मुख्यमंत्र्यांकडं असा एक बाॅम्ब आहे जो सर्वांवर भारी पडतो”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपकडून होणाऱ्या सततच्या टीकेला कधी उत्तर देणार याकडं सर्वांचं लागलं होतं. अखेर विधानसभेत ठाकरे शैलीत उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका करताना विविध मुद्द्यांना स्पर्श केला. केंद्र सरकारवर मुख्यमंत्र्यांनी  नाराजी व्यक्त केली आहे.

ईडीची कारवाई, नवाब मलिक प्रकरण, गृहविभागावरील आरोप, पेनड्राईव्ह प्रकरण, भ्रष्टाचाराचे आरोप अशा विषयांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंनी सभागृहात देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की नाटोची मदत मागत आहेत, झेलेंस्की यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर बरं  झालं असतं, असं फडणवीस म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडं असा एक बाॅम्ब आहे तो म्हणजे टोमणे बाॅम्ब जो सर्वांवर भारी पडतो, या शब्दात ठाकरेंना फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात टोमण्याशिवाय काय होतं, हे अरूण्यरूदन आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. परिणामी पुन्हा भाजप-शिवसेना वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सभागृहात भाजपवर ठाकरे शैलीत टीका केली. भाषणादरम्यान ठाकरेंनी भावनिक भाषा देखील वापरल्याचा पाहायला मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

  देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”