“केरळचं उत्तर तामिळनाडूला….”; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला

मुंबई | महाविकास आघाडी (MVA Alliance) आणि भाजपमध्ये (BJP) सध्या टोकाचा राजकीय सत्तासंघर्ष चालू आहे. दोन्हीकडील नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thakeray) यांना सातत्यानं भाजपकडून लक्ष्य  केलं जात होतं. यावर एकदाची ठाकरे शैलीत टीका ठाकरेंनी विधानसभेत केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा, मुंबई महापालिका, फडणवीस सरकार, गृहविभाग, परमबीर सिंग प्रकरण अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत ठाकरेंनी आज चतूरस्त्र टीका करत विरोधकांना घायाळ केलं आहे.

भाजपकडून दहिसरच्या भुखंडाचा आरोप करण्यात आला होता. यावर बोलताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

दहिसरच्या फाईलवर फडणवीसांची सही आहे. एक्झामीन आणि डू द निडफूल, असा शेर फडणवीसांनी मारला होता, असं ठाकरे म्हणाले आहेत.

विधान परिषदेचे तत्कालिन विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या नावाचा उल्लेख केला तर चालेल ना, नाही तर केरळचं उत्तर तामिळनाडूला दिल्यासारखं तर होणार नाही ना, असं म्हणत ठाकरेंनी राणेंची खिल्ली उडवली आहे.

राणेंनी लोकसभेत बोलताना केरळच्या प्रश्नावर तामिळनाडूचं उत्तर दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. परिणामी सर्वांनाच राणेंच्या त्या भाषणाची आठवण झाली.

भुखंड खरेदीचा अधिकार राज्याच्या महसूल विभागाचा आहे आणि ते खातं तेव्हा चंद्रकांत पाटील यांच्याकडं होतं, असाही उल्लेख ठाकरेंनी आपल्या भाषणात केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

  देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”