“सध्या देशात एकच वाघ ते म्हणजे नरेंद्र मोदी”

मुंबई | हो, बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण आता देशात केवळ एकच वाघ आहे. आणि त्या वाघाचं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या उत्तर सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

शिवसेनेच्या म्हणण्यानुसार मंदिरातील घंटा वाजणारा हिंदू नको, तर आतंकवाद्याला बडवणारा हिंदू पाहिजे. हो आतंकवाद्याला बडवणारा हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. भारतीय जवानावर हल्ला झाल्यानंतर सीमापार जाऊन सर्जीकल स्टाईल करणारा हिंदू नरेंद्र मोदी आहे. त्यांनी सीमेमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

मी जेव्हा म्हणालो राम जन्मभूमीच्या आंदोलनात अयोध्येमध्ये तुमचा एकही नेता नव्हता, तर किती मिरची लागली. अरे मै तो अयोध्या जा रहा था, मै तो बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, तुझको मिरची लगी तो मै क्या करू?, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

अरे हो, मी गेलो होतो बाबरी पाडण्यासाठी याचा मला अभिमान आहे, असं म्हणतदेवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही” 

  “कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल

  “मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”

  Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

  राज ठाकरेंबाबत भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…