“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत”

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर आहेत. यावेळी संत तुकाराम महाराज शिळा मंदीराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते संपन्न झाला आहे.

या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. तसेच वारकरी देखील मोठ्या संख्येने या सोहळ्यावेळी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या नामघोषाने परिसर दुमदुमला. या कार्यक्रमाकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं होतं.

संत तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर उपोषणाला बसले होते ती शिळा देहूतील मुख्य मंदिरात स्थापीत करण्यात आली आहे. त्यामुळे या मंदिराला शिळा मंदीर असे संबोधले जात आहे.

शिळा मंदीराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी आज देहूत सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी खऱ्या अर्थाने वारकरी असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, या सोहळ्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. सर्वांनाच या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची उत्सुकता लागली असून अखेर आज हा सोहळा पार पडला.

महत्त्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुण्यात आगमन; विमानतळावर अजित पवार, फडणवीसांकडून स्वागत

‘…म्हणून शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये’; जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले

“असं करुन तुम्ही शरद पवार यांची प्रतिष्ठा कमी करताय”; कोर्टानं पोलिसांना फटकारलं

कोल्हापुरात वातावरण तापलं; शिवसेनेचे पराभूत पवार संभाजीराजेंवर संतापले

निवडणूक आयोग राजकारण्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत!