पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुण्यात आगमन; विमानतळावर अजित पवार, फडणवीसांकडून स्वागत

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वागतासाठी उपस्थित होते. यानंतर हेलिकॉप्टरमधून देहूकडे रवाना होणार आहेत.

नरेंद्र मोदी आज देहूमध्ये वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. मोदींची सभा ज्या ठिकाणी दुपारी दोन वाजता होणार आहे त्या ठिकाणी आतापासूनच वारकरी येण्यास सुरुवात झाली आहे.

देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणाऱ्या व्यक्तींना नेहमीप्रमाणे काळ्या रंगाचे शर्ट, बनियन, टोप्या, मोजे घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. जे लोक काळे कपडे घालून येत आहेत त्यांना कपडे बदलण्यस सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अशाच एका फॅनला पोलिसांनी काळा शर्ट घालून आल्याबद्दल शर्ट बदलण्यास सांगितलं. मोदींच्या या फॅनची याबाबत कोणतीही तक्रार नाही.

दरम्यान, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) हे आज देहूत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“असं करुन तुम्ही शरद पवार यांची प्रतिष्ठा कमी करताय”; कोर्टानं पोलिसांना फटकारलं 

कोल्हापुरात वातावरण तापलं; शिवसेनेचे पराभूत पवार संभाजीराजेंवर संतापले 

निवडणूक आयोग राजकारण्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत! 

प्रकाश आमटे यांच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर