पालखी मार्गाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले…

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर आहेत. यावेळी संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला.

शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधलं. सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी देहूच्या लोकांना माझं वंदन असं म्हणत मराठीतून भाषणाला सुरूवात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहूनगरीत बोलताना पालखी मार्गाच्या विकासासाठी मोठी घोषणा केली आहे. पालखी मार्गासाठी 350 किलोमटरचा महामार्ग तयार करण्यात येणार असल्याचं मोदींनी सांगितलं.

पालखी महामार्गासाठी सरकार 11 हजार कोटींचा खर्च करणार असल्याची घोषणा देखील मोदींनी केली आहे. मोदींच्या सभेसाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील सभेला उपस्थित होते.

या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने वारकरी असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, मुंबईतील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे सर्वांचच लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत”

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुण्यात आगमन; विमानतळावर अजित पवार, फडणवीसांकडून स्वागत

‘…म्हणून शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये’; जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले

“असं करुन तुम्ही शरद पवार यांची प्रतिष्ठा कमी करताय”; कोर्टानं पोलिसांना फटकारलं

कोल्हापुरात वातावरण तापलं; शिवसेनेचे पराभूत पवार संभाजीराजेंवर संतापले