“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत”

मुंबई | काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे शस्त्रक्रिया झाली तेव्हापासून ते जनतेसमोर आले नसल्याने, हिवाळी अधिवेशनात तरी ते उपस्थित राहणार काय? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहेत.

उद्धव ठाकरे बरे होईपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा भार कोणाकडे तरी सोपवण्यात यावा, अशी मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे. यासाठी आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे असे पर्यायही भाजपने पुढे केले आहेत. मात्र आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय सुचवला आहे.

रामदास आठवलेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी यांनी यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

जीवना वेगळी मासोळी अशी अवस्था सध्या भाजपची झाली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी भाजपवर केली आहे. तसेच पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत, असं त्यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असून त्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे मात्र खोटं रेटून बोलण्याची फडणवीसांची जुनी सवय असल्याचे जनतेच्या मनात कधीही स्थान निर्माण करू शकत नाहीत, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

मधुमेह असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर 

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण! 

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; Omicron चं सुरुवातीचं लक्षण आलं समोर 

मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करता येणार नाही, पालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय