“पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपच नंबर वन असेल”

मुंबई | मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव (k. chandrashekhar rao) मलाही येऊन भेटले होते. कालच्या त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवा भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

सर्वांनी मागच्या लोकसभेत हातात हात घालून मोठी आघाडी केली होती. त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. देशातील विविध राज्यात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. कुठेही त्याचा परिणाम झाला नाही. खरं तर आता तेलंगणात टीआरएसची अवस्था वाईट आहे. मागच्या लोकसभेत तेलंगणात भाजपच्या चार जागा निवडून आल्या होत्या. पुढच्यावेळी तेलंगणात भाजपच नंबर वन असेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

रोज काय होत आहे. हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झालं. सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणांबाबत काय चाललं आहे सर्व लोक पाहत आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

गावोगावी काय चाललंय हे सर्व पाहत आहे. सुडाचं राजकारण कोण करत आहे सर्वजण पाहत आहेत. सरकारची सुडाची भावना त्यातून पुढे येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. त्याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे सरकार सुडाचं राजकारण करत आहे. मात्र, न्यायालय आहे. त्या संदर्भात योग्य कार्यवाही करेल, असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

‘ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या राणेंना…’; ‘या’ शिवसेना नेत्याने राऊतांना सुनावलं

डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा! 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी भाऊ वाटतो, कारण…” 

“सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”