देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट!

मुंबई | पुरेसं संख्याबळ असताना देखील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पराभवाचा सामना करावा लागला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमुळे शिवसेनेच्या संजय पवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये मतभेद आहेत. आघाडीचे आमदार हे त्यांच्याच सरकारवर नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्हाला आमचा उमेदवार मागे घेऊ नका अशी विनंती केली होती. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहिलो, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

विधान परिषदेत आमचे किती उमेदवार लढतील याबाबत एक-दोन दिवसात ठरवू. ही लढाई सोपी नाही याची आम्हाला जाणीव आहे. सरकारच्या आमदरांमध्ये खूप मतभेद आहेत. त्यांच्या मनात सरकारच्या विरोधात भावना आहेत, असं ते म्हणालेत.

आम्हाला आमच्या सरकारला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्रात आम्ही सोशीक आहोत. आमचं कोणतंही काम होत नाहीय. त्यामुळे त्यांच्या भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी एका फोरमच्या रुपात आम्ही उभे आहोत, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.

ते समोरुन येऊन आम्हाला सांगतात की तुम्ही तुमचा उमेदवार मागे घेऊ नका. आम्हाला आमच्या सरकारला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्रात आम्ही सोशीक आहोत, असं गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

“तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत” 

“106 काय 130 असूद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांचं एकच वक्तव्य, संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट 

…तर संजय राऊतांचा पराभव झाला असता; या पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ