नवी दिल्ली | अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या परखड मतांमुळे चर्चेत असतात. आता प्रकाश राज यांनी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे.
सामाजिक व राजकीय मुद्यांवर ते परखडपणे मत मांडतात. भाजपचे टीकाकार म्हणून ते ओळखले जातात. अनेकदा भाजपविरोधात भूमिका मांडणाऱ्या प्रकाश राज यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना लक्ष्य केलं आहे.
इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार केला पाहिजे. लोकांनी स्थानिक भाषांना पर्याय म्हणून इंग्रजीत बोलण्याऐवजी हिंदीला प्राधान्य दिलं पाहिजे, असं अमित शहा म्हणालेत.
ज्या राज्यांमध्ये हिंदी बोलली जात नाही त्यांनी त्यांच्या राज्यातील भाषेनंतर इंग्रजीऐवजी हिंदी बोलण्यावर भर द्यावा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं नुकतंच केलं. त्यांच्या नेमक्या याच वक्तव्यावर प्रकाश राज यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शहांच्या व्हिडीओची एक क्लिप प्रकाश राज यांनी शेअर केली आहे. आमची घरं तोडण्याचे प्रयत्न बंद करा, असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. आम्ही तुम्हाला बजावून सांगतोय की आमच्यावर हिंदी थोपणं बंद करा, असंही राज म्हणाले.
आम्ही आमच्या देशातील विविधतेवर प्रेम करतो. आमचं आमच्या मातृभाषेवर प्रेम आहे. आम्ही आमच्या ओळखीवर प्रेम करतो, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
प्रकाश राज यांनी देखील वेळोवेळी भाषिक मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे अमित शहांना ते टार्गेट करताना दिसतात. त्यामुळे आता त्यांनी प्रचिती मागील काही दिवसांपासून वाढली देखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ, म्हणाले ‘शरद पवार साहेबांना….’
थेट युक्रेनमध्ये पोहोचले ब्रिटेनचे पंतप्रधान; झेलेंस्कींसोबत रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 3435 रिक्त जागांवर बंपर भरती, आजच करा अर्ज
“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय”
अनिल देशमुखांना सर्वात मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश