“कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली, आता फक्त ISIS…”

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कुख्यात गुंड दाऊदशी संबंधित मालमत्ता व्यवहारांमध्ये हात असल्याच्या कारणावरून ईडीकडून अटक करण्यात आली.

नवाब मलिकांच्या अटकेनंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर सातत्यानं जहरी टीका करायला सुरूवात केली आहे. परिणामी राज्यात मोठा तणाव वाढला आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेकडं सत्तेची सूत्र आहेत. परिणामी भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

नवाब मलिकांचं प्रकरण शांत होत नाही तोच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या एका वक्तव्यानं परत राजकारण पेटलं आहे.

एमआयएमची महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी असल्याचं वक्तव्य जलील यांनी केलं आहे. त्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

वाह, एमआयएमची महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी आहे. कट्टरपंथींना पण शिवसेना आपली वाटायला लागली आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

आता फक्त इसिसचा प्रस्ताव येणं बाकी आहे, खरंच करून दाखवलं, अशी जहरी टीका राणेंनी शिवसेनेवर केली आहे. परिणामी राणे आणि शिवसेनेतील वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जलील यांच्या वक्तव्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण पेटलं आहे. शिवसेनेकडून आम्ही यासाठी तयार नसल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर” 

“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…” 

मोठी बातमी! युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांनी केल्या ‘या’ मागण्या