देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादेत गुपचूप उरकली बैठक, ‘या’ विषयावर चर्चा झाल्याची शक्यता

औरंगाबाद | विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये धुसफूस सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत बैठक घेतल्याचं समोर आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल दुपारच्या सुमारास ही बैठक घेतली. मुंबईहून नागपूरला जाताना फडणवीस यांनी औरंगाबादेतील नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीला औरंगाबाद शहरातील राज्य पातळीवरील नेते उपस्थित होते.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर ही बैठक झाल्याने या बैठकीला वेगळं महत्त्व आहे. या बैठकीत भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी स्वत:ही भाजपने  तिकीट न दिल्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ही बैठक घेतल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून मला उमेदवारी दिली नसेल- चंद्रशेखर बावनकुळे

-पायी जाणार्‍या मजुरांना पाणी, जेवण उपलब्ध करून द्या; आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

-…म्हणून रणजितसिंह मोहितेंना तिकीट दिलं; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

-“२ दिवसात पंकजा मुंडेंनी चांगला अभ्यास केला, मला आणि इतरांना तो जमला नाही”

-…त्यासाठी दहशत निर्माण करणाऱ्या ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा- संजय राऊत