मुंबई | एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अनेक नेत्यांंनी यावर प्रतिक्रिया दिली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील याच मुद्द्यावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाला उधाण आलं आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील याच मुद्द्यावरून आता भाजपला टोला लगावला आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना मुस्लीमधार्जिणी झाल्याचं म्हणत आहेत. जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना विचारला आहे.
मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का?, असे खोचक सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि ज्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहत असते ते उत्तर देऊ शकतात का?, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
“देवेंद्रजी, चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”
एमआयएमच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल”
‘हा’ व्यवसाय सुरू करून महिन्याला कमवू शकता 50 हजार रुपये!
मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…