जालना : सत्ताधारी भाजप आज पूर्णपणे भ्रष्टाचारात बरबटलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही. भाजपच्या खटारा गाडीत अनेक जणं कोंबले जात आहे. महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारे भाजप स्वतःच राष्ट्रवादी’युक्त’ होऊन बसले आहे, असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान भोकरदन येथे आयोजित सभेत मुंडे बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठकारे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, तेव्हा भाजपच्या भल्याभल्यांची टरकायची. त्यामुळेच राज ठाकरे यांना आज ईडीची नोटीस बजावली आहे.
भाजपविरोधात आवाज केला तर आवाज दाबला जातोय. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्याला देशात लोकशाही जिवंत आहे की नाही? असा प्रश्न पडत असल्याचं, धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
दानवे यांना जनतेने अनेकवेळा संधी दिली. त्यांच्या मुलाला आमदारकी दिली पण ‘खाऊ’साहेब दानवेंनी नेहमीसारखा ‘चकवाच’ दिला. मुख्यमंत्र्यांसारखेच दबावतंत्र दानवे वापरत आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. भोकरदन येथे बोलताना मुंडे यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि जालना मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर देखील निशाणा साधला.
दरम्यान, आपल्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले जात आहेत. येत्या निवडणुकीत यांना निवडून न देता चकवा देऊयात, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत भले ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बहुमत मिळाले असेल तरी भोकरदनची अभूतपूर्व गर्दी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार येथे निवडून येणार हे निश्चित आहे. ही उर्जा कायम ठेवा. #शिवस्वराज्ययात्रा #भोकरदन @NCPspeaks @AjitPawarSpeaks pic.twitter.com/ryUhLI7Iz0
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 19, 2019
महत्वाच्या बातम्या-
-मनसेची आज बैठक; ईडीविरोधात आंदोलनाच्या तयारीत!
-“…त्यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा”
-मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा फडणवीसांवर आरोप; कठोर कारवाईची मागणी
-पूरग्रस्तांना दिलासा; सरकारकडून ‘या’ महत्वाच्या घोषणा
-पवारसाहेब, सोडून द्या! कावळेच ते!; ‘सामना’तून शरद पवारांवर टीका