“महाविकास आघाडीला विधानपरिषद निवडणुकीत मोठं खिंडार पडेल”

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या रणनीतीने महाविकास आघाडीला मोठे खिंडार पडेल, असं वक्तव्य भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे. यामुळे येत्या विधानपरिषद निवडणुकीत देखील भाजप आघाडीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं आहे.

पेठनाका येथे स्ववनश्री नानासाहेब महाडीक यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते असताना भाजपने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत पक्षाचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचं हे ऋण कधीही न फिटणारं आहे, असं महाडिक म्हणाले.

माझ्या विजयाचे सर्व श्रेय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनाच जातं. पुरेसं संख्याबळ नसतानाही दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना विजयाची हमी देत फडणवीस यांनी आखलेली रणनीती सगळ्या देशाने पाहिली, असं ते म्हणाले.

आता येत्या विधानपरिषद निवडणुकीत गुप्त मतदान होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील खदखद आणि उफाळून येईल. या सरकारविषयी जनतेत असंतोष आहेच मात्र त्यांच्या आमदारांमध्येही आहे हे लवकरच स्पष्ट होईल, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई! 

15 जूनपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

कराडमध्ये शेट्टी-महाडिकांची गळाभेट ; महाडिक राजू शेट्टींच्या रस्त्यातच पाया पडले 

महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?; पराभवानंतर शिवसेना ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता 

“असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे आम्ही आमचं दुर्दैव समजतो”