काहीही झालं तरी महाआघाडीच बहुमत सिद्ध करणार- धनंजय मुंडे

मुंबई | माझं अजित पवारांवर असलेलं प्रेम वेगळं, मात्र अजित पवार जोपर्यंत पक्षात होते तोपर्यंत माझे त्यांच्याशी संबंध होते. मी राष्ट्रवादीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आता अजित पवारांकडे कोणताही गट नाही. माध्यमांच्या डोक्यातून निघालेल्या या सगळ्या कल्पना आहेत, असं राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळे आमदार हॉटेल ‘ग्रँड हयात’मध्ये जमा झाले होते. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आणि पक्षप्रमुख उपस्थित होते.  यावेळी तिन्ही पक्षांच्या आमदारांना संविधानाची शपथ देण्यात आली. यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपकडे बहुमत नाही. आजच्या कार्यक्रमातून महाआघाडीचं बहुमत महाराष्ट्रासमोर नाही तर देशासमोर आलंय. कोणत्याही परिस्थितीत विधीमंडळाच्या पटलावर आम्हीच बहुमत मत सिद्ध करू, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

अजित पवारांनी त्यांचा वैयक्तिक निर्णय घेतला आहे. आता माझे आणि अजित दादांचे कोणतेही संबंध उरलेले नाहीत, असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

महत्वाच्या बातम्या-