अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 5380 कोटींची मदत मुख्यमंत्री फडणवीसांनी केली जाहीर

मुंबई | राज्यातील सत्तास्थापनेच्या गोंधळात तांत्रिक बाबींमुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या राज्यातील अवकाळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याच्या आकस्मिकता निधीतून 5380 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला मंजुरी दिली आहे.

देेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री सहाय्यक निधीतील धनादेशावर सही करीत एका गरजू महिलेला 1 लाख 20 रुपयांची मदत केली आहे. महिलेला केलेल्या मदतीनंतर  मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आकस्मित निधीतून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 5380 कोटी रुपयांच्या निधीला सोमवारी मंजुरी दिली आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यानं लवकरात लवकर सरकार स्थापन होईल आणि आपल्यासाठी मदत मिळेल अशी आशा या शेतकऱ्यांना होती.

राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर कोणताही पक्ष सत्तास्थापन करु शकला नव्हता. त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली होती. या परिस्थितीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हतं.

 

महत्वाच्या बातम्या-