“महाराष्ट्राचा सह्याद्री अभेद्य पाठीशी… आम्हाला काय कुणाची भिती”

मुंबई | महाराष्ट्राचा सह्याद्री अभेद्य पाठीशी… चला मावळ्यांनो, आम्हाला काय कुणाची भिती, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत मोठी पडझड होत आहे. बरेच मोठे नेते पक्षाला रामराम करत भाजप-सेनेत जात आहेत. त्याचवेळी पक्षातले नेते कार्यकर्ते पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

नेत्यांच्या पक्षांतराबाबत बोलताना राष्ट्रवादीेचे अध्यक्ष शरद पवारांनी गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता धनंजय मुंडेंनी आपलं मत ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केलं.

शरद पवार गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच्या दौऱ्यावर आहेत. या यात्रेदरम्यान, महाराष्ट्र तरूणांच्या हातात देऊन घडवायचाय असं शरद पवार वारंवार सांगत आहेत.

दरम्यान, कुणीही पक्ष सोडला तरी फरक पडत नाही कारण आमच्याकडे शरद पवार आहेत, असा विश्वास  राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते वारंवार व्यक्त करत आहेत. त्याच आशयाचं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 

धनंजय मुंडे यांचं ट्वीट-

महाराष्ट्र्राचा सह्याद्री उभा अभेद्य पाठी
चला मावळ्यांनो, आम्हांला काय कुणाची भीती…@PawarSpeaks @NCPspeaks #MaharashtraElections2019 pic.twitter.com/iOtgA7LDGT

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 22, 2019

महत्वाच्या बातम्या-