बाळासाहेबांनी उद्धवपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम केलं- नाराणय राणे

पुणे | बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर उद्धवपेक्षा जास्त प्रेम केले. शिवसेनेत असताना आम्ही जेवढी आंदोलनं केली आहे, त्याबाबत उद्धव ठाकरेंना माहित पण नसेल. मी शिवसेनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतही सर्वाधिक लोकप्रिय नेता होतो, असं ज्येष्ठ नेते नारायण राणे म्हणाले आहेत.

पुण्यात आयोजित ‘युवर्स ट्रूली नारायण राणे’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

आताची शिवसेना व्यावसायिक बनली आहे. शिवसेनेच्या आमदारांना नीतिमत्ता उरलेली नाही. आता शिवसेनेच्या वाघाची शेळी बनली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी शिवसेनेवर केली.

तानाजी सावंत यांना पैसे घेऊन मंत्रीपद दिलं आहे. सावंतांनी किती पैसे दिलेत हे सगळ्यांना माहिती झालंय. शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार, महापौर केलं जातं, असा गंभीर याच कार्यक्रमात राणेंनी शिवसेनेवर केला.

उद्धव ठाकरेंना काहीही चांगले दिसत नाही. एखाद्या चांगल्या व्यक्तीचे त्यांना कौतुकही करवत नाही, असा टोलाही राणेंनी जाताजाता लगावला.

महत्वाच्या बातम्या-