सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने 12 कोटी रुपये मागितले का? करीना मौन सोडत म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. आपल्या मुलाच नाव जहांगीर असं ठेवल्यानं नेटकऱ्यांनी करीनावर कडाडून टीका केली होती.

तसेच करीना काही दिवसांपूर्वी रामयणावर बनणाऱ्या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेमुळे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने 12 कोटी रुपयांची मागणी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं होतं.

आता करीनाने याप्रकरणावर मौन सोडत उत्तर दिलं आहे. नुकतंच एका वहिनीने करीनाची मुलाखत घेतली. या मुलाखतीत करीनाला सीतेच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर करीनाने जास्त काही न बोलता फक्त हो असं म्हटलं आहे.

करीनाने या मुलाखतीत दिलेलं उत्तर ऐकून करीना या चित्रपटात काम करत नसल्याचं दिसत आहे. यावर करीनाने अधिक बोलणं टाळलं आहे. करीनाऐवजी या चित्रपटात सीतेची भूमिका कोण साकारतंय, हे अद्याप समोर आलं नाही.

सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी या मुद्द्यावरून करीनाला ट्रोल केलं असलं तरी देखील काही कलाकार करीनाच्या समर्थनार्थ पुढे आले होते. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू देखील करीनाच्या समर्थनार्थ समोर आली होती.

तापसी याप्रकरणी बोलताना म्हणाली होती की, बॉलिवूड मधील मोठ्या महिला अभिनेत्रींपैकी करीना एक आहे. ती जर तिच्या कामासाठी मोबदला मागत असेल तर त्यात काय चूक आहे. पुरुष कलाकार काही अशा चित्रपटामध्ये फ्रीमध्ये काम करत नाहीत.

दरम्यान, करीना आता ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता अमीर खान तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच करीना ‘तख्त’ या चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“‘शेरशाह’ चित्रपट करून चूक केली, असं मला वाटू लागलं आहे”

अरे बापरे! सलमान चक्क घोड्यासोबत खातोय चारा, व्हिडीओ व्हायरल

विद्युत जामवालच्या डेटिंगची सर्वत्र चर्चा, करिश्मासोबत आहे खास कनेक्शन

…म्हणून माधुरी आणि भारती चालू कार्यक्रमात ढसाढसा रडल्या, पाहा व्हिडीओ

तालिबान्यांशी हिंदुत्वाची तुलना करणं स्वरा भास्करला महागात पडलं, FIR दाखल?