हनी ट्रॅप रॅकेटमध्ये फडणवीस सरकारमधील मंत्र्याचा सहभाग- दिग्विजय सिंह

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये देशातील सर्वात मोठे हनी ट्रॅप रॅकेट उघडकीस आलं आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी यावरुनच भाजपवर टीका केली असून त्यांनी या प्रकरणात भाजपच्या काही मंत्र्यांची नावे घेत हे मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.

दिग्विजय सिंह यांनी खुलासा करताना महाराष्ट्रातील फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याचे नाव घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचाही प्रकरणामध्ये सहभाग आहे. ज्यावेळी हे प्रकरण घडले तेव्हा निलंगेकर हे महाराष्ट्र युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.  

जेव्हा श्वेताचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ती महाराष्ट्रामध्ये कोणाबरोबर होती?, श्वेता आणि निलंगेकर यांचे काय संबंध आहेत हे प्रसारमाध्यमांनी शोधून काढावे,’ असंही दिग्विजय म्हटलं आहे.  

देशातील सर्वात मोठा ब्लॅकमेलिंग सेक्स स्कॅण्डल म्हटल्या जाणाऱ्या या प्रकरणात आतापर्यंत तपास यंत्रणांनी चार हजाराहून अधिक फाईल्स तयार केल्या असून अद्यापही तपास सुरु आहे. या गँगने आतापर्यंत चार राज्यातील महत्त्वाचे नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर आणि मोठे व्यापारी यांना आपलं शिकार बनवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-