मराठा मोर्चा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला जामीन मंजूर

मुंबई :  राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्ण जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

३० जुलै २०१८ रोजी चाकणमध्ये मराठा समाजाने मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराचा ठपका राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर ठेवण्यात आला होता. याच प्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.

दिलीप मोहितेंना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आणि त्यांची बाजू मांडली होती.

दिलीप मोहितेंना अटक होऊ शकते हे लक्षात घेता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जागोजागी निषेध सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. 

खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मोहितेंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-

-मुलाखत घ्यायला अजित पवार सोलापूरात गेले अन् राष्ट्रवादीचे 2 आमदारच गायब झाले!

-शरद पवार कुठं भेटले तर हात जोडून माफी मागेल आणि ते मला….- सचिन अहिर

‘पार्थ इज बॅक’! विधानसभेसाठी ‘ही’ महत्वाची जबाबदारी उचलायला सज्ज

-पवार घराण्याला पराभव दाखवणाऱ्या शिवसेना खासदाराचं मोदींकडून कौतुक!

-“राष्ट्रवादी शरद पवारांपुरती मर्यादित, तर अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद”