पुणे महाराष्ट्र

मुलाखत घ्यायला अजित पवार सोलापूरात गेले अन् राष्ट्रवादीचे 2 आमदारच गायब झाले!

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सोलापूरात मुलाखत घेण्यासाठी पोहचले मात्र सोलापूरातील मुलाखतीला पक्षाचे 2 विद्यमान आमदार गैरहजर होते.

माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल या दोन विद्यमान आमदारांनी मुलाखतीसाठी अजित पवारांकडे जाण्याचं टाळल्याचं समोर आलं आहे.

मोहोळमधील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे कारागृहात आहेत, तर माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे.

बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्याचबरोबर दिलीप सोपल हे पक्षातून बाहेर पडणार असल्याचीही जोरदार चर्चा रंगत आहे. 

बबन शिंदे आणि दिलीप सोपल या दोघांनी मुलाखतीला गैरहजेरी लावली त्यामुळे पक्षात आणखीणच चर्चांना तोंड फुटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहिते पाटलांनी स्वत: भाजपमधून निवडणूक लढवली नसली तरीही आपली सर्व ताकद भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने उभी केली होती. 

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार कुठं भेटले तर हात जोडून माफी मागेल आणि ते मला….- सचिन अहिर

‘पार्थ इज बॅक’! विधानसभेसाठी ‘ही’ महत्वाची जबाबदारी उचलायला सज्ज

-पवार घराण्याला पराभव दाखवणाऱ्या शिवसेना खासदाराचं मोदींकडून कौतुक!

-“राष्ट्रवादी शरद पवारांपुरती मर्यादित, तर अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद”

-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार; ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर???

IMPIMP