मृ.त्यूआधी दिशानं 100 नंबरवर फोन केला होता का?; पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा

मुंबई | सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृ.त्यूबद्दल एक नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दिशाने स्वतःचा मृ.त्यू होण्याआधी 100 नंबरवर फोन केला होता, असं आधी सांगण्यात येत होतं, मात्र हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. तिने 100 नंबरवर फोन केलाच नव्हता तर त्यावेळी ती तिच्या लंडनमधल्या एका मैत्रिणीशी बोलत असल्याचं तपासात समोर आलं आहे. यामुळे आता दिशा सालियनच्या मृ.त्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो की दिशा सालीयन प्रकरण, या दोन्ही प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहे. दिशा सालीयन प्रकरणात असाच एक खुलासा समोर आला होता. मृ.त्यूच्या अगदी काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून 100 नंबरवर म्हणजेच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला होता, अशी माहिती होती. पण दिशाने 100 नंबरवर फोन केलाच नव्हता अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांना फोन केल्यानंतर दिशाने सुशांतला फोन केला होता, असा खुलासा भाजपच्या एका नेत्याने उघड उघड केला होता. त्यांच्या या खुलाशानंतर एकच खळबळ उडाली होती. दिशाने पोलिसांना आणि सुशांतला बोलवून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडलं आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं.

दरम्यान, या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली होती. मुंबई पोलिसांनी केलेल्या या चौकशीत धक्कादायक वास्तव सत्य समोर आलं आहे. मुंबई पोलिसांसोबतच दिशाच्या आई वडिलांनी देखील याप्रकरणी चौकशी केली होती, त्यानंतर ही घटना समोर आली.

तपासात असं आढळून आलं की 1 जून ते 8 जून या कालावधीत दिशाच्या मोबाईलवरून मुंबई पोलिसांना कोणताही फोन करण्यात आलेला नव्हता. तसंच सुशांतलाही तीने फोन केलेला नाही, मात्र तिच्या नंबरवरुन एक फोन करण्यात आला होता. अधिक तपास केला असता हा फोन तीने तिच्या लंडनमधल्या मैत्रिणीला केला असल्याचं समोर आलं आहे.

दिशाच्या मोबाईलवरुन पोलिसांना फोन गेला होता मात्र-

मृत्यूच्या जवळपास एक महिना आधी म्हणजेच 10 मे रोजी दिशाच्या मोबाइलवरून 100 नंबरवर एक फोन करण्यात आला होता, असं तपासात समोर आलं आहे. यासंदर्भात महत्त्वाची माहिती देखील समोर आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी स्वतः यासंदर्भात खुलासा केला आहे.

सतीळ सालियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वतः दिशाच्या फोनवरून 100 नंबरवर फोन केला होता. दिशा आणि तिचा होणारा नवरा रोहन यांना आपलं मालाडचं घर स्वच्छ करण्यासाठी गाडीने जायचं होतं. त्यांना तिथे जाण्यासाठी ई-पास काढण्याची गरज होती. तो पास कसा काढायचा याची माहिती काढण्यासाठी पोलिसांना फोन केल्याचं दिशाच्या वडिलांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उदयनराजे की संभाजीराजे?, मराठा आरक्षणाचं नेतृत्त्व कुणी करावं?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

रिया चक्रवर्ती ‘या’ देशांतून सुशांतसाठी ड्र.ग्ज मागवत होती

रियानं मला ‘या’ कारणामुळं जबरदस्ती सुशांतची मॅनेजर बनवलं होतं; श्रुती मोदीचा धक्कादायक खुलासा

पूजा भट्टनं सांगितलं ड्र.ग्ज घेण्यामागचं कारण, सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल