‘ठाकरे सरकार बरखास्त करा’; भाजप नेते घेणार राज्यपालांची भेट

मुंबई | मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.

नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. अशातच आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामाचा दंड माफ केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

प्रताप सरनाईक यांच्या बांधकामाचा दंड माफ केल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता भाजप याच मुद्द्यावर लोकायुक्त आणि राज्यपालांकडे दाद मागणार आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावा आणि हे मंत्रिमंडळच बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच हे संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त झाले पाहिजे, असंही ते म्हणाले.

हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यासाठी आम्ही लवकरच लोकायुक्त आणि राज्यपालांची भेट घेऊन हे प्रकरण त्यांच्या कानावर घालू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

नाना पटोले यांच्याविरुद्ध न्यायालयात आणि राज्यपालांकडे जाऊन तक्रार दाखल करणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यावर आता प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे नेते काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“नरेंद्र मोदी म्हणजे राम आणि कृष्णाचा अवतार, त्यांचा जन्मच देशाला वाचवण्यासाठी झालाय”

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”