भोपाळ | आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मध्य प्रदेशमधील राजकारण तापलं आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी होताना दिसत आहे.
मध्य प्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी मोदींना भगवान राम आणि कृष्णाचे अवतार असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसचे अत्याचार, भ्रष्टाचार आणि देशाची संस्कृती नष्ट झाल्यानं वातावरण खराब झालं होतं. हे सुधारण्यासाठी मोदीजींनी जन्म घेतला आहे, असंही ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला विश्वगुरू बनवण्याच्या दिशेने घेऊन जात आहेत. देशातून भ्रष्टाचार निर्मूलन करत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
जेव्हा जेव्हा भारतात संकट वाढले, अत्याचार वाढले, तेव्हा आपल्या धर्मात आणि संस्कृतीत देव दैवी अवतार घेतो असं म्हटलं जातं, असंही कमल पटेल म्हणाले आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पटेल यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आदिवासी दिग्गज तांत्या भील यांचा अवतार असल्याचं म्हटलं होतं. तंट्या भीलला भारतीय आदिवासी कथांमध्ये भारतीय रॉबिन हूड म्हणतात.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांची तुलना थेट राम आणि कृष्ण केल्यानं कमल पटेल सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. त्यावर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका
“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”
“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं”
“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”
‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला