“हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी उडी मारली तरी मी चिरडून जाईल”

सातारा | राज्याच्या राजकारणात छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद सातत्यानं गाजत असतो. आताही दोन्हीही राजे एकमेकांसमोर आले आहेत. दोन्हींमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे.

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात आता एमआयडीसी भागातील एका कंपनीच्या प्रकरणावरून जोरदार वाद पेटला आहे. परिणामी या वादाची चर्चा साताऱ्यासह राज्यात आहे.

साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीवरून हा वाद वाढला आहे. या कंपनीची जागा भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी घेतली आहे. यावरून खासदार उदयनराजे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कामगारांवर अन्याय करणाऱ्या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडले पाहीजे, अशी टीका उदयनराजेंनी केली होती. त्यानंतर आता शिवेंद्रराजेंनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

मला चिरडायचे असेल तर हत्तीची गरज नाही. उदयनराजेंनी जरी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईल, असं वक्तव्य शिवेंद्रराजेंनी केलं आहे. परिणामी आता हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंडीत ऑटोमोटीव्ह बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा आरोप उदयनराजेंनी केला होता. यावर बोलताना शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. सध्या या दोन्ही राजांच्या वक्तव्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

सातारा एमआयडीसी परिसरातील उद्योग बंद पडण्यास उदयनराजे हेच जबाबदार आहेत. कारखानदारांकडून हप्ता घेणं, त्यांना दमदाटी करणं असले उद्योग उदयनराजेंनी केले आहेत, असा आरोप शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर लावला आहे.

सातारा एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत अन् आलेल्या कंपन्या उदयनराजेंच्या असल्या स्वभावाला कंटाळून निघून गेल्याची टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे. उदयनराजेंनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं देखील शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सातारा नगरपरिषद क्षेत्रातील कामांवरून दोघांमध्ये वाद रंगला होता. तर आता कंपनीच्या प्रकरणावरून दोन्ही नेते आमने-सामने आहेत. भाजपमधील वरिष्ठ नेते या दोघांतील वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार”

मराठी कलाकार लतादीदींच्या अंत्यदर्शनला का नव्हते?, हेमांगी कवी म्हणाली…

 व्हॅलेंटाईन वीक! Rose Day का साजरा केला जातो?; जाणून घ्या इतिहास

  राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; पंजाबमध्ये धक्कादायक प्रकार घडला

“लतादीदी राजकारणी नव्हत्या, आता स्मारकावरून राजकारण करू नका”