काॅंग्रेसमध्ये राज्यसभा उमेदवारीवरुन नाराजी, महासचिवांचा राजीनामा

मुंबई | सध्या राज्यसभा निवडणुकांचं घुमसान पहायला मिळत आहे. राज्यसभा उमेदवारांच्या नावावरुन पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूसही सुरु आहे.

राज्यातील सहा खासदारांसाठी नाव जाहीर करण्यात आली आहेत. अशातच आता काॅंग्रेस पक्षात नाराजीचं वातावरण असल्याचं दिसत आहे.

काॅंग्रेसनं महाराष्ट्रातून बाहेरचा उमेदवार दिल्यानं सध्या काॅंग्रसेमध्ये नाराजी आहे. तरुण नेतृत्वाला संधी दिल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पक्षाच्या निर्णयाची पाठराखण केली आहे.

राज्यसभेचा उमेदवार म्हणून महाराष्ट्राबाहेरचे इम्रान प्रतापगडी यांना निवडल्यानं काॅंग्रेसचे महासचिव आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

डाॅ. आशिष देशमुख यांनी काॅंग्रेसचे महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजीनामा जरी दिला असला तरी पक्षात राहणार असून पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधीवर कोणाचा तरी दबाव आहे, असंही शेलारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात संजय राऊतांनी आग लावली” 

 “विभास साठेंचा ‘मनसुख हिरेण’ होऊ नये”; किरीट सोमय्या आक्रमक

  मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले…

  आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडेंना मोठा धक्का, महाराष्ट्राबाहेर बदली

  Petrol Diesel संदर्भात महत्त्वाची बातमी, पेट्रोल पंप चालकांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय