‘डिव्हायडेड बाय Baroda, युनायटेड बाय Lucknow’, विरेंद्र सेहवागचं हटके ट्विट

मुंबई | आयपीएलच्या नव्या हंगामासाठी मेगालिलाव (IPL Auction 2022) आता बंगळुरूमध्ये पार पडत आहे. पहिल्या दिवशी अनेक दिग्गांना मोठ्या किंमती लागल्याचं पहायला मिळतंय.

भारतीय गोलंदाज तर आजच्या लिलावात मालामाल झाल्याचं पहायला मिळतंय. नव्याने सामिल झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्सने अष्टपैलू खेळाडूंवर भर दिल्याचं पहायला मिळतंय.

लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांना लखनऊ सुपर जायंट्सने संघात जागा दिली आहे. त्यामुळे आता जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. बडोद्याच्या एका सामन्यात या दोघांची मोठी भांडणं झाली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये हा वाद चर्चेला आला होता.

अशातच आता लखनऊ सुपरजायंट्सने दोन्ही खेळाडूंना संघात घेतल्याने भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग याने मजेशीर ट्विट केलं आहे.

हुडा आणि कृणाल ही चांगली जोडी असेल. Divided by Baroda, United by Lucknow, असं ट्विट सेहवागने केलं आहे. लखनऊ संघात हे दोन्ही खेळाडू असल्यानं आता वाद आणखी पेटणार की क्षमणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आयपीएल लिलावाचा उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा असणार आहे. अनेक स्थानिक आणि आजचे अनसोल्ड खेळाडूंवर आता उद्या बोली लागणार आहे.

पाहा ट्विट-


महत्त्वाच्या बातम्या  – 

नाद करा पण प्रीति झिंटाचा कुठं???; शाहरुख खानलाच विकत घेतलं!

मुंबईने लावली महाबोली! IPL इतिहासातील सर्वात महागडा विकेटकिपर मुंबईच्या ताफ्यात दाखल

 ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुमचं आयुष्य कमी तर होत नाही ना?, नॉनव्हेज खाणारांनो एकदा नक्की वाचा

मोठी बातमी! आयपीएलची लिलाव प्रक्रिया थांबली, Auctioneer अचानक खाली कोसळले ; पाहा व्हिडीओ