नाद करा पण प्रीति झिंटाचा कुठं???; शाहरुख खानलाच विकत घेतलं!

बंगळुरू | आयपीएल सिझन 2022 च्या हंगामापूर्वी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया बंगळुरूमध्ये पार पडत आहे. अशातच प्रत्येक संघ आपल्या ताफ्यात चांगले खेळाडू घेण्यासाठी चढाओढ करत आहेत.

सर्व संघ मालक आपापल्या क्रिकेट तज्ज्ञांसह लिलावात सहभागी झाले आहेत. मर्यादित रक्कमेत आपल्या संघात धाकड खेळाडूंना सहभागी करून घेण्यासाठी संघाना मेहनत करावी लागतीये.

लिलावादरम्यान नवीन खेळाडूंवरही चढ्या दरानं बोली लावण्यात आली. तामिळनाडूचा आक्रमक फलंदाज शाहरूख खानसाठी सर्व टीममध्ये तुफान लढत पहायला मिळाली आहे.

शाहरूख खान हा गत हंगामात पंजाब किंग्ज संघाकडून आक्रमक फलंदाजी करताना दिसला होता. शेवटच्या काही षटकांमध्ये विरोधी गोलंदाजीचा खाननं चांगलाच समाचार घेतला होता.

शाहरूख खानच्या गतवेळीच्या हंगामातील कामगिरीच्या जोरावर यावेळी त्याच्यासाठी अनेक संघानी बोली लावली. शेवटी प्रीति झिंटाच्या पंजाबनं शाहरूख खानला तब्बल 9 कोटी किंमत देऊन खरेदी केलं आहे.

शाहरूख खानसाठी कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघात आणि प्रिति झिंटाच्या पंजाब संघामध्ये जोरदार युद्ध रंगलं होतं. पण शेवटी पंजाबनं शाहरूखला आपल्या ताफ्यात दाखल केलं.

स्थानिक क्रिकेटमध्ये यावेळी शाहरूखनं धमाकेदार कामगिरी केली आहे. विजय हजारे ट्राॅफीत शाहरूखनं आक्रमक फलंदाजी केली होती. परिणामी शाहरूख खानला खरेदी करण्यासाठी पंजाबनं भली मोठी किंमत मोजली आहे.

दरम्यान, शाहरूखला गतवर्षी पंजाबनं 5 कोटी 25 लाख रूपयांना विकत घेतलं होतं. आत परत एकदा पंजाबच्या ताफ्यात शाहरूखला दाखल करून घेण्यात पंजाब व्यवस्थापक यशस्वी ठरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या  – 

मुंबईने लावली महाबोली! IPL इतिहासातील सर्वात महागडा विकेटकिपर मुंबईच्या ताफ्यात दाखल

 ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुमचं आयुष्य कमी तर होत नाही ना?, नॉनव्हेज खाणारांनो एकदा नक्की वाचा

मोठी बातमी! आयपीएलची लिलाव प्रक्रिया थांबली, Auctioneer अचानक खाली कोसळले ; पाहा व्हिडीओ

क्रूझ पार्टी अटकेनंतर पहिल्यांदाच दिसला आर्यन खान, फोटो झाले व्हायरल