थरकाप उडवणारं सत्य! ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या मृत्युनंतर सेटवर घडायच्या भयानक गोष्टी; वाचा सविस्तर

मुंबई | चित्रपट सृष्टीत आजवर अनेक अभिनेत्री होऊन गेल्या. यातील काही अभिनेत्रींनी अल्पशा कालावधीतंच लाखो प्रेक्षकांच्या मनात आपली अशी प्रतिमा तयार केली की ,कित्येक दशके उलटून गेली तरी या अभिनेत्रींना प्रेक्षक विसरू शकले नाहीत. या अभिनेत्रींपैकीच एक अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती.

दिव्या भारतीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी दिव्या भारतीने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. 3 वर्ष चित्रपट सृष्टीत काम केल्यानंतर वयाच्या 19 वर्षी आपर्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता.

सर्वात कमी वयात चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवून चित्रपट सृष्टीला सोडून जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी दिव्या भारती एक होती. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला होता. चित्रपट सृष्टीतील बड्या दिग्गजांसह अनेक चाहत्यांना देखील त्यावेळी अश्रू अनावर झाले होते.

5 एप्रिल 1993 रोजी जवळपास रात्री 11 वाजताच्या सुमारास दिव्या भारतीचा मृत्यू झाला होता. दिव्या भारतीने मृत्यूपूर्वी तब्बल 92 चित्रपट साईन केले होते. दिव्याच्या निधनानंतर या सर्व चित्रपटांच्या दिग्दर्शकांना दिव्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रींची रिप्लेसमेंट हवी होती.

मृत्यूपूर्वी दिव्याने जे 92 चित्रपट साईन केले होते. त्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे लाडला. लाडला चित्रपटात अनिल कपूर आणि रविना टंडन होते. दिव्याने मृत्यूपूर्वी लाडला चित्रपटाचे बरेच सीन शूट केले होते. मात्र, दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या जागी श्रीदेवींची वर्णी लागली होती.

लाडलाचे जे सीन दिव्याने शूट केले होते ते सर्व सीन श्रीदेवीने पुन्हा शूट केले. दिव्याच्या मृत्यूनंतर तब्बल 6 महिन्याने पुन्हा लाडलाचे शूटिंग सुरू झाले होते. यावेळी लाडलाच्या सेटवर अनेक विचित्र घटना घडल्या होत्या.

माहितीनुसार, लाडलाच्या सेटवर एक दिवस शूटिंग चालू होतं. यावेळी सेटवर श्रीदेवी, शक्ती कपूर आणि रविना टंडन देखील होते. सर्व शूटिंग व्यवस्थित चाललं होतं. मात्र, एक सीन शूट करताना श्रीदेवी सारखं अडकळत होती.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाच सीन शूट करताना दिव्या भारती देखील अडकत होती. यामुळे सेटवर उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. हे पाहून रविना टंडन आणि शक्ती कपूर देखील खूप हैराण झाले होते. ही गोष्ट माध्यमांमध्ये छापून आल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

घाई करा! येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो सोन्या-चांदीचा दर; वाचा आजचे दर

बाबो! ‘या’ ड्रायव्हरनं असं काही केलं की गेंड्यानं गाडीला दणादण आदळलं; पाहा व्हिडीओ

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लूकवर चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

आज ‘या’ भागात कोसळणार पाऊस, हवामान खात्याने दिला…

‘एवढी गचाळ का राहतेस?’; टीका करणाऱ्या महिलेला…