ऐकावं ते नवलंच! एका झुरळामुळे इंजिनिअर पतीने पत्नीला मागितला घटस्फोट; वाचा काय आहे प्रकरण?

भोपाळ | अलीकडच्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून देखील पती पत्नी एकमेकांपासून वेगळे होताना पाहायला मिळतात. पत्नी पत्नींच्या भांडणांमुळे यामध्ये त्यांची मुले भरडली जातात. अनेक सामाजिक संस्थांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

अनेकवेळा घटस्फोट घेण्यामागे अशी काही विचित्र कारणे समोर येतात जी अविश्वसनीय असतात. काही कारणे ऐकून तर हसावं की रडावं हे देखील उमजत नाही. सध्या असंच एक प्रकरण मध्य प्रदेश मधील भोपाळ मधून समोर आलं आहे.

झुरळ म्हणलं की अनेकांना भीती वाटते. काही मुली तर झुरळाचं नाव जरी ऐकलं तरी संपूर्ण घर डोक्यावर घेतात. मात्र, सध्या जे प्रकरण समोर आलं आहे. त्यामध्ये हेच झुरळ एका कपलच्या घटस्फोटाचं कारण ठरलं आहे. आपली पत्नी झुरळाला घाबरते म्हणून चक्क पतीने तिला घटस्फोट मागितला आहे.

माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका तरुणाचं 2017 मध्ये लग्न झालं होतं. सुरुवातीला या दोघांचा सोन्याचा संसार चालला होता. सर्व काही अगदी व्यवस्थित चाललं होतं. दोघेही एकमेकांना समजून घेत होते.

मात्र, एक दिवस पत्नीने घराच्या किचनमध्ये झुरळ पाहिलं आणि ती मोठ्याने किंचाळली. पत्नीच्या किंचाळण्याने घरातील सर्व लोक घाबरले आणि किचनमध्ये पळत गेले. यानंतर या घरात झुरळ असल्याने पतीने हे घर बदलण्याचा निर्णय घेतला.

या जोडप्याने घर तर बदललं. मात्र, पत्नीची झुरळाविषयीची भीती काही कमी झाली नाही. या जोडप्याने 3 वर्षांत तब्बल 18 घरे बदलली आहेत. यामुळे हा पती आता पत्नीच्या घाबरण्याला कंटाळला आहे. पत्नीच्या या वागण्याने संपूर्ण कुटुंबाला लाजिरवण्या क्षणांना सामोरं जावं लागत आहे, असा पतीचा आरोप आहे.

पतीने या पत्नीला अनेक मानसोपचार तज्ज्ञांना देखील दाखवलं आहे. मात्र, पत्नी कोणत्याही मानसोपचार तज्ञाची ट्रीटमेंट घ्यायला तयार नाही. पत्नीचा कुटुंबावर आरोप आहे की, विनाकारण तिला वेडं ठरवलं जात आहे. तिची समस्या समजून घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही.

पत्नीच्या याच वागण्याला कंटाळून अखेर पतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण सध्या भाई वेलफेअर सोसायटी मध्ये आहे. वेलफेअर सोसायटीच्या लोकांनी या जोडप्याला सांगितलं आहे की, घटस्फोटाचं हे कारण होऊ शकत नाही. सध्या या दोघांची काऊन्सेलिंग चालू आहे.

महत्वाच्या बातम्या –

थरकाप उडवणारं सत्य! ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या मृत्युनंतर सेटवर घडायच्या भयानक गोष्टी; वाचा सविस्तर

घाई करा! येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो सोन्या-चांदीचा दर; वाचा आजचे दर

बाबो! ‘या’ ड्रायव्हरनं असं काही केलं की गेंड्यानं गाडीला दणादण आदळलं; पाहा व्हिडीओ

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लूकवर चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

आज ‘या’ भागात कोसळणार पाऊस, हवामान खात्याने दिला…