चेहऱ्या ऐवजी ‘या’ ठिकाणी मास्क लावल्यामुळे महिला होतीय सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. मागील काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

परंतू असं असतानाही काही लोकांना त्याच गांभिर्य नसल्याचं दिसून येतं. बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता ही सोशल मीडिायावर खूप अॅक्टिव्ह असते. दिव्याने सोशल मीडियावर हैराण करणारा एक फोटो टाकला आहे. तिने टाकलेला फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा फोटो शेअर करत त्या फोटोवर दिव्याने ‘भगवान जाने और क्या, क्या देखना है!’ असं लिहीलं आहे. या फोटोत एका महिलेने मास्क चेहऱ्याला न लावता चक्क ते मास्क आपल्या केसांना लावल असल्याचं दिसतं आहे.

या फोटोतील महिला किती बेजबादार आहे दिसून येत आहे. त्यामुळे या फोटोतील महिलेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. मात्र काही महिला यूजर्स सोशल मीडियावर फोटोतील महिलेचं कौतुक करतं आहेत. तसेच  दिव्याने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत.

एका यूजरने तर लिहिले की,  ती महिला आहे. ती काहीह करू शकते. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, चेहऱ्याचा योग्य वापर करत आपल्या देशातील ही महान महिला आहे. आपल्या देशात पावला-पावलावर विविधता पाहायला मिळते आणि हीच आपल्या देशाचं वैशिष्ट असल्याचं त्यानी म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे एका युजरने या महिलेचं कौतुक करत धन्य आहे भारतीय नारी, असं म्हटलं आहे. तसेच यावर खूप मीम्सही व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! तुम्हाला कोरोना होऊन गेलाय की नाही हे कसं…

एक नारी सब पर भारी ! महिलेनं साडीवर केले खतरनाक स्टंट, पाहा…

जंगल सफारी करताना अचानक गाडीतच शिरला सिंह अन्…, पाहा…

प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेने असं काही केलं की…

सेम टू सेम! करिश्मा कपूरसारख्या दिसणाऱ्या ‘या’…