घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर कशी काळजी घ्याल?, वाचा सविस्तर

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. मागील काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

अनेक लोकांना कोरोना कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याने होत आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात कोणला कोरोना रोगाची लागण झाली असेल तर, कशाप्रकारे काळजी घ्यायची याविषयी माहिती तुम्हाला माहिती देणार आहोत.

केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रेसीडेंट डॉ. के. के. अग्रवाल यांनी काही टीप्स सांगितल्या आहेत. सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. अनेक सुविधाची कमतरता भासत आहे. अशा परिस्थित जे कोरोनाबाधित रूग्ण जास्त सिरीयस नसतील, तर त्यांच्यावर घरच्या घरी उपचार करता येऊ शकतात, असं डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

यासाठी डॉ. अग्रवाल यांनी खालील चार स्टेपचा अवलंब करायला सांगितला आहे.

  1. जर तुमच्या घरात कोणाला कोरोनाची लागण झाली असेल, तर त्या व्यक्तीला लगेच आसोलेट म्हणजे वेगळे ठेवा.  त्या व्यक्तीला डबल मास्क वापारायला सांगा आणि तुम्हीही डबल मास्क लावा.
  2. तुम्ही जर कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात येत असाल किंवा गर्दीच्या ठिकाणी कामाला जात असाल, तर तुम्ही फेस शील्ड लावून ठेवा.
  3. त्या सोबतच रोज मीठाच्या पाण्याच्या गुरळ्या करणे अत्यंत महत्वाचे आहे.
  4. तसेच घरात कोरोना रुग्ण असल्यास रुग्णासहीत घरातील लोकांनीही शू कव्हर घातले पाहिजे.

या टीप्समुळे जे कोणी कोरोना रुग्णांच्या संपर्कात येत आहेत. जे कोणी लोकं या रुग्णांची काळजी घेत आहेत. त्यांना फायदा होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या-

चेहऱ्या ऐवजी ‘या’ ठिकाणी मास्क लावल्यामुळे महिला…

जाणून घ्या! तुम्हाला कोरोना होऊन गेलाय की नाही हे कसं…

एक नारी सब पर भारी ! महिलेनं साडीवर केले खतरनाक स्टंट, पाहा…

जंगल सफारी करताना अचानक गाडीतच शिरला सिंह अन्…, पाहा…

प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेने असं काही केलं की…