जाणून घ्या! तुम्हाला कोरोना होऊन गेलाय की नाही हे कसं ओळखायचं?

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. मागील काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

या दरम्यान अनेकांना असं वाटतं की आपल्याला कोरोना होऊन गेलेला आहे. परंतू काय खरंच तुम्हाला कोरोना तुम्हाला होऊन गेला आहे का? तसेच सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये काही लक्षण प्रकर्षाने दिसून येत आहेत. चला तर आज आम्ही तुम्हाला याविषयी माहीती देणार आहोत.

  • इतरवेळी कोणतं इन्फेक्शन झालं की आपले डोळे लाल होत होते. परंतू कोरोना रूग्णांमध्ये डोळे लाल होणे हे प्रमुख लक्षण दिसून येतं आहे.
  • यासोबतच कोरोनाची लागण झाली असल्यास डोकेदुखी, पोटात दुखणे अशा समस्याही रुग्णांना जाणवू लागतात.
  • तुम्हाला थकवा जाणवू लागेल. दैनंदिन कामं त्याचप्रमाणे अगदी सोपी-सोपी कामं करतानाही तुम्हाला थकवा जाणवेल.
  • कोरोनाची लागण झाल्यावर अनेकांना संभ्रम, बैचेनी आणि एकाग्र राहण्यात अडचणी येते. याला ब्रेन फॉग असं म्हणतात. त्यामुळे जर तुमचे चित्त थाऱ्यावर नसेल, तुम्ही शुल्लक गोष्टीही विसरत असाल, तर हे कोरोना झाल्याचं लक्षण असू शकतं.
  • कोरोना विषाणू हा आपल्या शरिरात शिरल्यानंतर डायरेक्ट आपल्या पचनसंस्थेवर हल्ला करतो. त्यामुळे तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच तुम्हाला भुकही लागत नाही.
  • श्वास घेताना त्रास होणे हेही कोरोनाचे प्रमुख लक्षण मानले आहे. जर तुमच्या श्वासोश्वासाचा वेग वाढला असेल, तर तेही कोरोनाचं लक्षण असू शकते.

त्यामुळे जर तुम्हाला अशाप्रकारची लक्षणे जाणवत असतील, तर लवकरात लवकर कोरोनाची टेस्ट करून घ्या. दिवसेंदिवस परिस्थीती खालावत चालली असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा हलगरजी पणा करू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

महत्वाच्या बातम्या-

एक नारी सब पर भारी ! महिलेनं साडीवर केले खतरनाक स्टंट, पाहा…

जंगल सफारी करताना अचानक गाडीतच शिरला सिंह अन्…, पाहा…

प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेने असं काही केलं की…

सेम टू सेम! करिश्मा कपूरसारख्या दिसणाऱ्या ‘या’…

गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर,…