मुंबई | कोरोना काळात सर्व काही ठप्प पडलं होतं. त्यामुळे अनेकांना कोरोना काळात आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था देखील कचाट्यात सापडली होती.
मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी मागील वर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरीचा उंभरठा ओलंडला आहे. तर दुसरीकडे एलपीजीच्या किंमतीने देखील ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. या इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस मात्र आर्थिक कचाट्यात सापडल्याचं दिसतंय.
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने 120 चा आकडा गाठला आहे. तर डिझेलच्या दरात देखील 110 पर्यंत वाढ झाल्याचं दिसून येतंय. अशातच आता केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर आता 5 रूपयांनी कमी होणार आहे.
तर दुसरीकडे डिझेलच्या किंमतीत देखील घट केल्याचं पहायला मिळतंय. डिझेलच्या किंमतीत 10 रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर स्थित असल्याचं दिसून येतंय. गेल्या 7 दिवसात पेट्रोल आणि डिझेलमध्ये 35-35 पैशांची वाढ करण्यात आली होती.
इंधन दरवाढीवरून जनता रोष व्यक्त करत असताना केंद्र सरकार कोणत्याही प्रकारचे ठोस पावलं उचलताना पहायला नव्हतं. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होताना दिसत आहे.
इंधनाच्या किंमती वस्तू आणि सेवा कराच्या उच्च कक्षेत आणावं त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी राहतील, त्याच बरोबर सरकारला ही याचा मोठा फटका बसणार नाही, असं या एसबीआयच्या अहवालात म्हटलं होतं.
दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात केल्याने सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसून येतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
”The Lalit’ में राज छुपे है’; नवाब मलिकांकडून भाजपला खास दिवाळी शुभेच्छा
“चला आव्हान स्वीकारलं, आता होऊन जाऊ दे दूध का दूध और पानी का पानी”
“अजित पवार फसवाफसवी आणि बनवाबनवी करणं थांबवा”
सोनं खदेरी करणाऱ्यांसाठी सुर्वणसंधी, सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट
“…पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर एक शब्द देखील काढला नाही”